तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दि.५ शनिवार रोजी शिक्षक  दिनाचे औच्युत साधुन तुळजापुर(खुर्द) येथील न.प. शाळा क्रं ३ मधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.              

प्रथम सर्वपल्ली डाँ.राधाक्रष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अमर चोपदार व मुख्याध्यापक मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम,मकसुद शेख,युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना महामारीच्या काळात जगभरात सर्व काही बंद असताना मुलांचे आँनलाईन शिक्षण चालु आहे.कारण या कठीण काळात हि शिक्षक हे योद्ध्याप्रमाणे कोरोनाला हरविण्यासाठी ते दिवसरात्र प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन जनतेची सेवा देखील करत आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

 यावेळी शिक्षक साळुंखे, राऊत, निडवंचे, कुलकर्णी मैडम,सय्यद मैडम,गायकवाड मैडम,जाधव मैडम,भोजणे मैडम,कर्मचारी संजित देडे,संदिप गंगणे,तौफिक शेख,गणेश नन्नवरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप गंगणे व आभार गणेश नन्नवरे यांनी मानले.

 
Top