तुळजापुर : कुमार नाईकवाडी
गेल्या तीन-चार दिवसापासून शहरात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे तुळजापुर घाटातील झाडे उन्मळुन कोसळ्याने शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी तुळजापुर-सोलापुर महामार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी सुरू होती. सदरील बाब राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी बांधकाम व वनविभाग कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन कल्पना दिली. बांधकाम व वनविभाग कर्मचारी वर्गानी तातडीने घटनास्थळी जावुन झाडे बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
तुळजापुर घाटात गुरुवारी, शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने झाड उन्मळून कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती. शनिवार रोजी रा.काँ च्या पदाधिका-यांनी घाटात जावून रस्त्यावर उन्मळून पडलेले झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच घाटाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी लहानमोठे दगड रस्त्यावर आले होते.
पावसाचा जोर कायम राहिल्यास दरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी बुजलेली गटार, रस्त्यावर वाहणारे सततधार पाणी यामुळे घाटातील मार्गावर प्रवास जीवघेणा ठरत आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणुन दिली व त्या ठिकाणी बुजलेली नाली काढण्यास सांगण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवकचे शहराध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे आदीसह बांधकाम विभागाचे गायकवाड, वनविभागाचे शिंदे, मोरे आदीनी सहकार्य करुन घाटातील रस्त्यावर पडलेली झाडे तात्काळ काढुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.