काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रसिद्ध व्यावसायिक किराणा दुकानदार रामचंद्र श्रीरंग काळे वय (60) यांचे शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शेतामध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.