नळदुर्ग, दि. 19 : नगरपालिका व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या मोहिमेचा शुभारंभ शनिवार दि. 19 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथे करण्यात आला.

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता माझे कुटूंब माझी जबाबदारीय या मोहिमेंतर्गत न.प. व आरोग्य कर्मचारी शहरातील प्रत्येक घरी पोहचून नागरिकांची तपासणी करणार आहेत. याकामी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे, या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे वेळेवर उपचार करुन मृत्यू दर कमी करणे हे आहे. संसर्गजन्य कोरोना आजाराबद्दल नागरिकांनी घाबरुन जावू नये, आरोग्य पथकास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव यांनी केले.

रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी व रुग्णालयात दाखल करण्याकीरता यापूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रुग्णवाहिका नळदुर्गसाठी दिली आहे. तीच रुग्णवाहिका यापुढे कोरोना रुग्णांकरीता शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेस उपलब्ध करुन देणार असल्याचे कमलाकर चव्हाण यांनी यावेळी सांगतले. या रुग्णवाहिकेत स्व:खर्चाने ऑक्सिजन पुरविणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सैफन शेख जाहीर केले. त्यामुळे भविष्यात वेळेवर रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव, न.प. चे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, अजय काकडे, दिपक कांबळे, हरिभाऊ फुंड, राणुबाई सपकाळ, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, आयुब शेख, नवल जाधव शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, सुनिल गव्हाणे, बंडू कसेकर, नेताजी महाबोले, रणजित डुकरे, चंदर सगरे, भिमा कोळी, ओमकार कलशेट्टी, शहाजी येडगे, सतीश आखाडे, भिमसेन भोसले, फुलचंद सुरवसे, सुशांत डुकरे, वाल्मिक खारवे, अण्णा जाधव, परिचारिका अश्विनी शेरखाने, स्वयंसेविका जिजाबाई जाधव, शोभा ठाकूर, रेणुका जाधव, मन्नाबाई चंदेले, मयुरी जाधव, संगिता राठोड आदीजण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांसह न.प. व आरोग्य कर्मचा-यांचे शिवसेनेच्यावतीने सत्कार करुन सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.

शहर शिवसेनेच्यावतीने वाहनावर स्पीकर लावून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी करुन नागरिकांनी आरोग्य पथक व महाराष्ट्र शासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


 
Top