नळदुर्ग, दि. 19 : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने अणदूरची ग्रामपंचायत प्रशासकाच्या ताब्यात गेली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक पदावर तुळजापूर पंचायत समितीमधील ए.आर. खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सन 2015 मध्ये अणदुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. अणदूर ग्रा.पं. च्या १७ सदस्यीय कार्यकारिणीची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीमधील शाखा अभियंता ए. आर. खान यांची नेमणूक झाली आहे.  तर ग्रामविकास अधिकारी डी. ए. चव्हाण हे कायम आहेत. येत्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत प्रशासक काम पाहतील. 

 
Top