तुळजापुर : कुमार नाईकवाडी
केद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार दि. १५ रोजी तुळजापूर तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापुर्वी केंद्र सरकारकडून कांदा दर नियंत्रणमुक्त केले व कांदा अत्यावश्यक वस्तुच्या कायद्यातुन काढले, असे असतानाही केंद्रातील भाजपा सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला आणि आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतल्याचा आरोप करत पुढे म्हटले आहे की, दलालांना पोसण्यासाठी शेतक-या प्रति बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतक-यांचा बळी घेणार आहात, त्यामुळे शेतक-यांचे कंबरडेच मोडणार आहे. या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, धनंजय पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, संदीप गंगणे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तौफीक शेख, व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष समर्थ पैलवान, गणेश नन्नवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

