उस्मानाबाद, दि. 15 : उस्मानाबाद जिल्हयात आज मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 226 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 88 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 958 झाली आहे. यातील 6 हजार 641 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 56जणांवर उपचार सुरु आहे.

