तुळजापूर, दि. 24 : तुळजापुर-लातूर या महामार्गावरील काक्रंबा ता. तुळजापुर गावामध्ये रस्त्याचे काम चालू आहे. तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे ते खड्डे आज गुरुवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काक्रंबा शाखेच्या वतीने महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले.
काक्रंबा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी प्रहारचे आभार मानले आहेत. यावेळी शाखाप्रमुख जाकिर अन्सारी, अकबर अन्सारी, मोसिन पठाण, महबूब अन्सारी, सोमनाथ झाडे, बाबू पेंटर आदी प्रहार सेवक उपस्थित होते.
