जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पारायण कमिटीचे मार्गदर्शक व पंचक्रोशीतील भक्ती संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते ह.भ.प. वसंत सावंत यांची अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या तुळजापूर तालुका उपप्रसिद्धीप्रमुखपदी निवड झाली आहे.
वसंत सावंत यांचा जळकोट परिसरात भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यात सतत सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी वसंत सावंत यांची तुळजापूर तालुका उपप्रसिद्धी प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. या निवडीचे जळकोट येथील पारायण कमिटी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, जळकोट भागातील विविध गावातील पारायण कमिटी, भक्ती संप्रदायातील सेवेकरी, जळकोट ग्रामस्थ यांनी स्वागत केले आहे.
