जळकोट : मेघराज किलजे
संतगाडगे बाबा स्वच्छता अभियान गुणांकन नोंद राउंड २ अंतर्गत दि. २ रोजी जि. प. प्रा. मानमोडी शाळेस जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत मानमोडी गाव आणि शाळेस स्वच्छता कक्ष अधिकारी पाणी व आरोग्य स्वच्छता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, गादगे व सहकारी यांनी भेट देऊन शाळेचा परिसर, कार्यालय, स्वच्छतागृह ,शालेय पोषण आहार ,ई लर्निंग तसेच शाळेच्या परिसरात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीने भाजीपाला लागवड याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
गावातील अंडरग्राउंड गटारी ,प्रत्येक घरात करत असलेली रंगरंगोटी अनेक वस्तीमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच गोपाळ सुरवसे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गुंजकर ,सदस्य राजेंद्र चौगुले ,राजेंद्र गायकवाड ,पिंटू थोरात, पवार , राहुल कदम गुंजकर ,आशा कार्यकर्त्या , अंगणवाडी कार्यकर्ते ,चिंचखोरी तांडा शाळेचे मुख्याध्यापक जाधव , सहशिक्षक जाधवर सर ग्रामसेवक शिंदे ,विनोद आडे, आरोग्य सेविका श्रीमती जाधव ,मुर्टा ग्रामपंचायत सदस्या, मुर्टा अंगणवाडी सेविका व मदनिस, मानमोडी शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,रमेश दूधभाते ,रामकृष्ण मोहिते ,श्रीमती सुचिता चव्हाण उपस्थित होते .
