नळदुर्ग : सुहास येडगे
स्वच्छ भारत योजने मध्ये जिल्हयात पहिल्या क्रमांकावर आलेल्या नळदुर्ग पालिकेच्या नळदुर्ग शहरात बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. शहरातील बऱ्याच भागात अजून ही डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. तर अनेक ठिकाणी गटारी अजूनही तुंबलेल्या आहेत. त्याचबरोबर राजकारणाचा बळी ठरलेला कृष्ण मंदीरा शेजारचा भागही घाणीच्या साम्राज्याने माखलेला आहे. ना लाईट ना गटारी ना कचरा गोळा करण्यासाठी पालिकेचे वाहन, यामुळे हा कृष्ण मंदीराचा भाग दुर्लक्षीत झाला आहे. त्यामुळे पालिका आता तरी या भागाकडे लक्ष देईल का असा प्रश्न नागरीकांतून होत आहे.
गेल्याच आठवडयात पालिका स्वच्छ भारत योजने अंतर्गत जिल्हयात पाहिल्या क्रमांकारवर आली आहे, तशा बातम्या विविध वर्तमान पत्रात आल्या आहेत. पण हा केवळ कागदो पत्रीचा खेळ आहे, कारण शहरात मोठया प्रमाणात घाणीने गटारी भरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी शहरातील कांही भागात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. शहरात मागील आठवडयात डुकरे पकडण्याची मोहीम पालिकेने राबविली खरी पण शहरात आजून ही डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे, त्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य वाढले आहे, पालिका स्वच्छ भारत अभियानात जिल्हयात अव्वल क्रमांकारव आली त्यामुळे शहरवाशीयांकडून पालिकेचे कौतुक होत आहे, परंतु शहरात असे अनेक भाग आहेत की त्या भागात कचरा गोळा करणारे पालिकेचे वाहन जात नाहीत, त्या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा वाढल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, शहरातील पालिकेकडून दुर्लक्षीत राहीलेला भाग म्हणजे कृष्ण मंदीर परिसर, या परिसरात सध्या मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, या ठिकाणी ना गटारी आहेत ना लाईट आहे, ना पालिकेचे कचरा गोळा करणारे वाहन येत नाही अशा परिस्थीतीत या परिसरातील नागरीक घाणीच्या साम्राज्यामध्ये राहत आहेत.
दरम्यान पालिकेला स्वच्छ अभियानात पहिला क्रमांक जरी मिळाला असला तरी शहरातील अनेक ठिकाणी साठलेली घाण पाहता पालिका स्वच्छतेच्या बाबतीत पहिली कशी काय आली हा प्रश्न नागरीकांना पडला आहे. शहरात मराठा गल्ली, गवळी गल्ली, कृष्ण मंदीर परिसर, किल्ला गेट परिसर या ठिकाणी अजून ही डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे, मग पालिकेने डुकरे पकडण्याची मोहीम केवळ फोटो काढण्यापुरतीच केली की काय असा ही प्रशन सध्या नागरीकांना पडला आहे. मराठा गल्लीतील पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे की जे एकमेव असे शौचालय आहे, त्याचा नागरीकांकडून वापर केला जात आहे, पंरतु पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे या शौचालयामध्ये मोठया प्रमाणात घाण साठली आहे, पाईप ब्लॉक झाले आहेत त्यामुळे या ठिकाणच्या नागरीकांनी पालिकेला अर्ज देवून ही याची स्वच्छता केली जात नाही. आज या ठिकाणी शौचास जायचे म्हटले तर नागरीकांना व महीलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बाबीकडे जाणीवपूर्वक पालिकेचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे शहर स्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आले असले तरी शहरातील ज्या भागात अणखीन घाणीचे साम्राज्य आहे त्या ठिकाणची घाण पालिकेने तात्काळ काढून घ्यावी व या स्वच्छ शहराचे सौदर्य वाढविण्यासाठी पालिकेने प्रयत्न करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

