कळंब, दि. 02 :
सागर बारकुल, अमोल राऊत, परमेश्वर थोरात, कृष्णा गंभीरे, सर्व रा. कळंब यांनी दि. 01.09.2020 रोजी महावितरणच्या कळंब उपविभागीय कार्यालयासमोर मास्क न लावता, सोशल डीस्टन्सींग न पाळता विज बिल आकारणी विरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी कार्यालयातील संगणक व साहित्य, टेबल- खुर्च्या, केबीनच्या काचा यांची तोडफोड करुन कार्यालयीन कागदपत्रे फाडून शासकीय मालमत्तेचे अंदाजे 50,000/-रु. किंमतीचे नुकसान केले. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला.
यावरुन महावितरणचे सहायक अभियंता- वैभव गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 353, 269 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम- 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
