नळदुर्ग, दि. 02 : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दि.१ सप्टेंबर रोजी (वय १०४) रोजी निधन झाले. महाराजांना तुळजापूर तालुक्यातील किलज येथील समाज बांधवांच्यवतीने आज बुधवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी १९४७ साली स्वातंत्र्य काळात सक्रिय सहभाग घेऊन दोन वेळा तुरुंगवास भोगला होता. ते विविध धर्माच्या प्रश्नासाठी झटत होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरली आहे. किलज ता. तुळजापूर येथील बसवेश्वर चौकात बुधवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राम जळकोटे यांनी महाराजांबदल थोडक्यात आपले विचार व्यक्त केले.
