मुरूम, दि. ४ : येथील मुदकण्णा गल्लीत राहणाऱ्या विजयाबाई मल्लिनाथ मुदकण्णा यांचे गुरुवारी (ता. ४) रोजी रात्री  एक वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, पती, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती शुक्रवारी (दि. ४) रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यापारी संघटनेचे सचिव राजशेखर मुदकण्णा यांच्या त्या मातोश्री होत्या.

 
Top