तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्र राज्य नपा, मनपा शिक्षक संघाची कार्यकारणी  जाहीर करण्यात आली असून यामध्ये राज्य उपाध्यक्षपदी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) येथील सहशिक्षक अशोक शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली. अशोक शेंडगे यांच्या कडे लातूर विभागाचा कारभार सोपवला आहे.

राज्यातील  सर्वाधिक पटसंख्या असलेल्या नगर पालिका शाळा क्रमांक 3 कराड शाळेचे मुख्याध्यापक आणि संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी निवड केली आहे. तसे पत्र राज्याचे सरचिटणीस अरुण पवार यांनी दिले आहे.

अशोक शेंडगे यांनी नगर परिषद शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांनी शाळेत 2000 सालापासून तसेच 2009 -10, 2010- 11 साली तुळजापूर नगर परिषद नगरपरिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द )शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक अबाधित ठेवला तसेच 2015 साली मराठवाड्यातील पहिली iso शाळा करण्याचा बहुमान त्यांनी शाळेस मिळवून दिला. सदरील कार्याची दखल घेऊन संघटनेच्या राज्यउपाध्यक्ष पदी अशोक शेंडगे यांची  निवड केली.

सदरील निवडीबद्दल उस्मानाबाद जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामराव कोळी, मार्गदर्शक जयंत इंदापूरकर, राजेंद्र धावारे, कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड,  सरचिटणीस  उमाकांत देशमुख, सल्लागार संतोष खंगले यांनी नूतन राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे यांचा सत्कार केला.


 
Top