नळदुर्ग : एस.के. गायकवाड
कोरोना विषाणू महामारीच्या काळात सर्व मंदिर ,मजीद,चर्च बंद आहेत. तरी ही मी देव पाहीला देव तो म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जिव धोक्यात घालून रूग्णांना सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्यात मी खरा देव पाहीलाआहे.असे गौरवपूर्ण उदगार वागदरी ता.तुळजापूर येथील जेष्ठ कार्यकर्ते तथा तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर यांनी तुळजापूर येथील भक्तनिवासात आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कारा प्रसंगी केले.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आपल्या देशात ही आपण गेल्या पाच सहा महिन्या पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ऱोकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत .तरी ही दिवसेनदिवस कोरोनाच्य रुग्ण संख्येत वाढ होताना दिसते आहे.वागदरी येथील ठाकूर कुटुंबातील काही सदस्य कोरोना पाँजिटीव्ह आढळून आल्याने
तुळजापूर येथिल कोव्हिड-१९ ,सेंटर १०८ भक्त निवास येथे त्यांचे संपूर्ण कुटुंबच क्वायंटाईन करण्यात आले होते .त्यांचा दहा दिवसाचा क्वायंटाईन काळ संपल्या नंतर निघेटिव्ह आहवाल आलेल्या सदस्यांना घरी पाठविण्यात आलेअसता त्यांनी भक्त निवास सोडण्यापूर्वी दि.०३नोव्हेंबर २०२० रोजी कोव्हिड काळात रूग्णांना सेवा देणारे डॉक्टर ,आहार व्यवस्थापन कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींचा ठाकुर परिवाराच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाकुर परिवाराचे जेष्ठ सदस फत्तेसिंग ठाकुर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि ,देव मंदिरात नसुन देव कोरोना काळात रूग्णांना सेवा देणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी, आहार व्यवस्थापन कर्मचारी यांच्यात आहे.सद्या कोव्हिड १९ रोगाच्या राष्ट्रीय साथरोग आपत्तीच्या काळात रोगाने बळी पडलेल्या रूग्णांना आरोग्य, मानसिक, धीर देण्याचे काम करणारे सर्व कर्मचारी खरे लढवय्ये आहेत. कांही न्युज चॅनेल,वृत्तपत्रांतून या व्यवस्थेवर विविध आरोप करण्याच्या बातम्या प्रकाशित करताना दिसत आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.कामठाणे,आहार विभाग प्रमुख दिनेश सुर्यवंशी, आहार कर्मचारी आकाश डोंगरे, सफाई कर्मचारी सौदागर पौळ, गणेश डांगे, राहुल राठोड, बंडू काशिद, राम शिंदे, अनिल मुळे आदी सह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
