नळदुर्ग : एस.के. गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग,वागदरी पाटी,गुजनूर,शहापूर ते गुळहळ्ळी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून वहान चालकासाठी हा रस्ता जीव घेणारा ठरत आहे. या सस्त्यावरून वहान चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वास्तविक पाहता तुळजापूर, नळदुर्ग, आक्कलकोट मार्गे  घानगापूर तिर्थक्षेत्र झोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वहानाची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा देऊन दोन पदरी मोठा सिमेंट रस्ता बनविण्याच्या कामाला शासनाने मंजुरी दिल्याने या रस्त्याच्या बांकामाला वेगाने सुरुवात करण्यात आली होती. आक्कलकोट वरुन सुलतानपूर पाटी पर्यंत जवळपास २८ कि.मी.दुतर्फा सिमेंटच्या रस्ताचे काम पूर्ण होत आले आहे.आता फक्त गुळहळ्ळी, शहापूर, गुजनूर, वागदरी ते नळदुर्ग या १२ ते १३ कि.मी.चे काम गेल्या दिड दोन वर्षा पासून शेतकऱ्यांनी आडवनुक केल्याने रखडले आहे. रोडमध्ये संपादित जमीनीचा मोबदला मिळावा असी त्यांची मागणी आहेअसे समजते. त्यासाठी शेकऱ्यानी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे समजते. परंतु यापूर्वीच या रोडची जमीन संपादित झाली असून संपादित जमीनीवरच हा रोड बनविला जाणार असून या रस्त्याच्या वळण दुरूस्ती मध्ये जर नव्याने ज्या शेकऱ्यांची  जमीन भुसंपादी होत असेल त्या शेतकऱ्यांना त्या जमीनीचा मावेजा मिळेल तरी शेतकऱ्यांनी या रोडचे काम सुरू करण्यास सहकार्य करावे. आसी भूमिका शासनाने घेतल्याचे समजते.न्यायालय,शासन आणि शेतकरी यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या रस्त्याची आवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या दुर्योधनासारखी झाली आहे. यातून मार्ग कधी निघणार हा मोठा प्रश्न आहे.

पूर्वी होता तोही रस्ता संबंधित गुत्तेदाराने उखडून टाकला आहे. त्यामुळे पावसाच्या सरी आल्या की, या रस्त्यावर चिखल होतो. सर्व गाड्या चिखलात आडकतात शिवाय मोठी वहाने जावून मोठी खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत. वागदरी पाटी ते नळदुर्ग सहा कि.मी.अंतर पार करण्यासाठी खराब रस्तामुळे आर्धा तासाहून अधिक वेळ लागतो आहे. पावूस पडल्यावर या रस्त्यावरून जाणारे अनेक दुचाकी स्वार गाडी घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. पण आपली कैफियत सांगावी कोणाला म्हणून मुग गिळून गप्प बसले आहेत. तरी शासनाने या कामी त्वरित लक्ष घालून या रस्त्याच्या प्रलंबित कामाला सुरुवात करावी असी मागणी ग्रामस्थातून होते आहे. तो पर्यंत संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावरील खड्डे दगड मातीने भरून त्या वर मुरूम खडी टाकून तात्पुरती सोय करावी अशी मागणी केली जात आहे.


 
Top