रुईभर, दि. 4 : उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथील स्वातंत्र्यसैनिक बळीराम देवराव कोळगे (वय 85)यांचे गुरुवारी (दि3) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यांनी गोवा मुक्ती स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी उस्मानाबाद येथील कपिलधरा स्मशानभूमीमध्ये करण्यात आला.
