नळदुर्ग, दि. 04 : चिकुंद्रा ता. तुळजापूर येथे योग्य नियोजनाअभावी गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ऐन पावसाळयात साथीचे आजार उदभवण्याची शक्यता असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या सौ. सुमन अरुण गायकवाड यांनी पत्राद्वारे ग्रामसेवकाकडे केली आहे.

ग्रामपंचायत सदस्या गायकवाड यांच्या वार्डामधील प्रभाकर मोटे यांच्या घरापासून ते विठ्ठल गायकवाड यांच्या घरापर्यंत गटारीचे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंगू, मलेरिया यासारखे साथीचे आजार उदभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर गटारीचे सांडपाणी व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.


 
Top