जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. कृष्णा रेड्डी यांनी मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका गाईला दुसऱ्या गाईचे  ब्लड ट्रान्सफर करून प्राण वाचवले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच असा यशस्वी प्रयोग करून दाखवल्याबद्दल डॉ. रेड्डी यांचा जळकोट ग्रामपंचायत व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सरपंचपती संजय माने व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. कृष्णा रेड्डी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी जनावरांच्या लसीकरण मोहीमेस शुभेच्छा देण्यात आल्या. 

या कार्यक्रमास सचिन राठोड, शिवराज राचेट्टी, विकास चव्हाण,सैदोबा कारले, सेवक काशिनाथ मुडे, अतुल लोखंडे, सुनील साखरे, सुरज अंगुले, बालाजी पालम पल्ले, गोपाळ सगर, लहू कारले, बाळू कदम, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील पशुपालक उपस्थित होते.


 
Top