तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील सलून व्यवसायीक सुरेश चौधरी यांची महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनच्या उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष सोमनाथ काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नाभिक बांधवांचे संघटन वाढीसाठी कार्य करावे तसेच महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशन शहरापासून ते गावागावात पोहोचवण्यास प्रयत्न करवा असे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे. पहिले मजबूत संघटन सोबत प्रबोधन आणि त्याच बरोबर विकास हाच एक ध्यास घेऊन आपण कार्य करावे यासाठी सुरेश चौधरी यांना महाराष्ट्र सलुन व पार्लर असोसिएशन व सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे.
