जळकोट : मेघराज किलजे
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी जळकोट येथे युवक काँग्रेसच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या विधेयकात शेतकरी विरोधी धोरण आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवक कांग्रेसचे श्रीनिवास पाटील, शंकर कदम, शिवराम कदम, माजी ग्रा.पं. सदस्य जितेंद्र कदम, सलिम तांबोळी, असद इनामदार, विश्वास भोगे, महेश कदम, ओंकार कदम, सुदर्शन पवार, अजय गंगणे, सौरभ कदम, महेश कुठार, गणेश सावंत,युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
