उस्मानाबाद, दि. 21 : नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच आता लागू झालेले नवीन शैक्षणिक धोरण या विषयी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी, युवका व युवतींनी ऑनलाइन मिटिंगद्वारे आपले मत मांडले.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विवेकानंद युवा मंडळ परिवार द्वारे ही अत्यंत महत्त्वाची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक केदार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यात विविध संघटनेच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपापली मते मांडली. तसेच शिक्षणक्रमाविषयी प्रसार व प्रचार करण्यास कटिबद्ध राहावे असा संदेश देखील त्यांनी मंडळामार्फत देण्यात आला. 

मिटींगचे संपूर्ण नियोजन मंडळाचे सहसचिव महेंद्रप्रताप जाधव यांनी केले. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे बाळकृष्ण साळुंके, स्वप्नील देशमुख, क्रांतिसिंह काकडे, कृष्णा एडके, शुभम माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top