उस्मानाबाद, दि. 21 : उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या दुकानाची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ.) दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत चालू राहतील, अशा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी काढला आहे. 

या अगोदर उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या दुकानाना सकाळी 9 ते 7 वेळेत सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता वेळेची मर्यादा दोन तासांने कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व अत्यावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ.) दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी राहील.

सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी, तसेच कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60, कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड सहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.




 
Top