विक्रम अशोकराव दासमे

उमरगा, दि. 21 :  तालुक्यातील कोराळ व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उडीद, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हातातोंडशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दयावी अशी, मागणी कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केली आहे.

जिल्ह्यात सलग पाच दिवस दमदार पाऊस झाला आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने पावसामुळे काढलेल्या उडदाला कोंब फुटले आहेत.ज्यांनी पिक काढले नाही त्या शेतकऱ्यांचे उडीद शेतातच पाण्यात उभे आहे.उभ्या पिकालाही कोमारे फुटले आहेत.सोयाबीनचे देखील अशीच गत झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असल्याने शेतकरी मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे. 

नुकसानीचे पंचनामे करा 

पावसामुळे कोराळ व परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक विक्रम अशोकराव दासमे यांनी केली आहे.


 
Top