नळदुर्ग, दि. 21 : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे यांच्या मातोश्री पद्माबाई भुजंगराव कांबळे वय 92 वर्षे यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या विद्यमान जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या आजी होत.
सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या अणदूर येथे बौद्ध धम्म संस्कार नूसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे मान्यवर, कार्यकर्ते, नातेवाईक उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले, तीन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे.
