शिराढोण, दि. 7 : शिवाजी बिछवा पवार, रा. पारधी वस्ती, देवधानोरा, ता. कळंब हे दि. 06.09.2020 रोजी 14.00 वा. सु. आपल्या कुटूंबासह राहत्या घरी होते. यावेळी त्यांचे नातलग असलेले 1) बालाजी शिंदे 2) दशरथ शिंदे 3) सागर शिंदे, हे तीघे भाऊ रा. मांडवा 4) बालाजी पवार 5) दत्ता पवार, दोघे रा. नागुलगांव 6) राहुल पवार, रा. देवधानोरा व अन्य 5 लोक घरासमोर आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी शिवाजी पवार यांच्यासह कुटूंबीयांस शिवीगाळ करुन कुऱ्हाड, लोखंडी गज, विळा, कोयता, काठी, दगडाने मारहाण सुरु केली. या मारहाणीत शिवाजी पवार यांचा जागीच मृत्यु होउन त्यांचा मुलगा- संतोष याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर दुसरा मुलगा- दिनकर यासह पुतण्या- तुकाराम हे गंभीर जखमी झाले. हा मारहाण प्रकार पाहुन शिवाजी पवार यांचा तीसरा मुलगा- अरुण हा घरातील पलंगात लपल्याने बचावला. अशा मजकुराच्या अरुण शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 307 इत्यादी नुसार गुन्हा नोंदवला आहे.