जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तुपाचे) ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी जळकोट बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे यांची नियुक्ती झाली असून प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

गंगाधर सर्जे यांनी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर माजी सरपंच राजशेखर कलशेट्टी, माजी उपसरपंच लक्ष्मण सोमवंशी,माजी ग्रामपंचायत सदस्य बसवंत मुळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज चौधरी, सहशिक्षक सुभाष पवार, कर्मचारी पोपट देडे आदी जणांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 
Top