जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील विद्यार्थी सेवा प्रकाशनचे संचालक, भाजपाचे वरिष्ठ नेते भिमाशंकर हासुरे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय परिषद सदस्यपदी उस्मानाबाद जिल्ह्यातून फेरनिवड झाल्याबद्दल जळकोट जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण व कुलस्वामिनी सूतगिरणीचे संचालक महेश कदम यांच्यावतीने भिमाशंकर हासुरे यांचा विद्याधन या त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते श्रीकांत हासुरे, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे, तुकाराम हासुरे प्रा. नीळकंठ औसेकर, नागनाथ किलजे, शशिकांत औसेकर, बाळू पट्टेवाले आदीजण उपस्थित होते.