चिवरी : राजगुरु साखरे
कोरोना संकटामुळे तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भाविकांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंदिर बंद असल्याने तीर्थक्षेत्र चिवरी येथील अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून व्यवसायिकयांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी केव्हा खुले होणार? याकडे भाविकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या श्री चिवरी महालक्ष्मी मंदिर परिसर सध्या हिरवाईने नटला आहे.
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडावीत या मागणीसाठी अनेक पक्ष, अनेक संघटना यांची आंदोलने झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे खुले करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्या तरी मंदिर केव्हा सुरू होणार याकडे लक्ष वेधले आहे. श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर मार्च महिन्यापासून बंद असल्याने येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुस्कान झाले आहे. शासनाने मंदिर सुरू केली तर भाविकांना समाधान वाटेल, तसेच भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. यात खास करून देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश , कर्नाटक आदी राज्यातील भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाविकांसह व्यापारी, पुजारी मंडळ देखील मंदिर खुले होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.चिवरी महालक्ष्मी मातेची मुख्य यात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते, मात्र वर्षभर मंदिरामध्ये यात्रेचे स्वरूप असते मंदिर बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांसह पुजारीचेही आर्थिक नुकसान झाले आहे.
