अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सुपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशेगाव ता. तुळजापूर येथे सहशिक्षकपदी कार्यरत असलेले दत्तात्रय राम माने यांचा "कांचन फाऊंडेशन मुस्ती" यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कोरोना या रोगाने जगावर भयानक संकट निर्माण केले आहे. या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माने हे अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एक आदर्श शिक्षक म्हणून हा पुरस्कार माने यांना देण्यात आला. याबद्दल माने यांचे कौतुक होत आहे.
