तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने येथील नदी (ओढा) दुधडी भरून वाहु लागली या पाण्याने नदीकाठावर असलेल्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.प्रशासनाच्या आदेशानुसार दि. २५ रोजी ग्रामस्तरीय समीतीच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतात जाऊन पहाणी करून पंचनामा करण्यात येत आहे.

तुळजापुर तालुक्यामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास एकाच पावसाने हिरावुन घेतला.कोरोना महामारी,वेळेवर पाऊस पडेना म्हणून अगोदरच शेतकरी हताश झाला होता मात्र रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले.थोड्या थोड्या पावसावर हाताशी आलेले सोयाबीन एकाच पावसाने पाण्यात गेले.या अतिवृष्टीमुळे तालुक्यामध्ये नदीकाठी असलेल्या शेतीतील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले या नुकसान झालेल्या पिकांची तलाठी,ग्रामविकास अधिकारी,कृषी सहाय्यक,यानी ग्रामस्तरावर समिती नेमुन ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकांचे जीपीएस फोटो काढुन पंचनामे करून याद्या बनवण्याचे आदेश तहसीलदार तुळजापुर यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.या अनुषंगाने तामलवाडी येथील नदीकाठावर असलेल्या नानासाहेब गायकवाड,शाहीर गायकवाड,श्रीकांत गायकवाड (गट नं.२६४) यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष  जाऊन तलाठी,ग्रामविकास अधिकारी यानी पहाणी केली व जीपीएस फोटो काढुन पंचनामे करण्यात आले आहेत.

याप्रसंगी तलाठी श्रीमती  ए.एल.राजमाने, ग्रामविकास अधिकारी तथा पर्यवेक्षक पी.एन.लाटकर, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, ज्ञानेश्वर माळी, भास्कर पाटील तसेच संबधित शेतकरी नानासाहेब गायकवाड, शाहीर गायकवाड, श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

नदीकाठचा एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या - तहसीलदार तांदळे 

अतिवृष्टीमुळे नदीकाठावर असलेल्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाच्या वतीने तलाठी/ग्रामविकास अधिकारी यांना जीपीएस फोटो काढुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असुन यामध्ये नदीकाठचा एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे तहसीलदार सौदागर तांदळे यानी आदेशीत केले आहे.सदरील कामामध्ये संबधित विभागाचे मंडळ अधिकारी,कृषी मंडळ अधिकारी,विस्तार अधिकारी यांची जबाबदारी राहणार असल्याचेही आदेशीत करण्यात आले आहे.


 
Top