तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सुरतगाव व गोंधळवाडी ता.तुळजापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक खर्चातुन स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
शाळा बंद शिक्षण चालु या उपक्रमांतर्गत सुरतगाव व गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक खर्चातुन स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महीन्यापासुन शाळा बंद असुन विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा या उद्देशाने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.यावेळी गोंधळवाडी येथील शाळेस तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे अशपाक शेख व सुरतगाव केंद्राचे केंद्रप्रमुख वाघचौरे यानी भेट दिली व शाळेतील विविध शैक्षणिक साहीत्याची पहाणी करून शाळेचे कौतुक केले.सुरतगाव येथील जि.प.शाळेतही हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नवनाथ सुरते यानी सर्व शिक्षकांचा सन्मान केला.
यावेळी सुरतगाव व गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
