जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील घोडके तांड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोडके तांडा  येथे स्वाध्याय पुस्तिकाचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पुजा जाधव ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रपमुख प्रकाश राठोड, गुरुनाथ राठोड, पोपट राठोड, गुलाब जाधव, पांडुरंग जाधव तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक , शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मोकाशे, सहशिक्षक श्री. संजय गायकवाड यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अविनाश मोकाशे यांनी केले.




 
Top