तुळजापूर : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील शुक्रवार पेठ आठवडा बाजार भागात असलेल्या नगरपरिषदच्या 124 भक्त निवास मध्ये सुरु असलेल्या कोविड-19 रुग्णालयात टाकण्यात येत असलेल्या ऑक्सिजन लाईनच्या कामाची पाहणी मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. त्याचबरोबर कोविड रुग्ण क्वारटांईन केलेल्या मंडळीशी चर्चा करुन सोयीसुविधा उपलब्ध होतात कि नाही ? औषधे, भोजन वेळेवर योग्य मिळते कि नाही याची पाहणी केली.
कोरोना रुग्णांचा वाढत्या प्रार्दुभाव पार्श्वभूमी शुक्रवार पेठ भागात असणाऱ्या नगरपरिषदेच्या भक्त निवास मधील कोविड रुग्णालयास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देवुन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व डाँक्टरांना योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर सांळुके, उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. चंचला बोडके. डॉ. शिरसीकर आदी उपस्थित होते.

