नळदुर्ग : एस.के. गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे आता कोरोना बाधितांची संख्या पाच झाली आहे.

   गेल्या पाच-सहा महिन्या पासून कोरोना विषाणूच्या महामरीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून शासनाने देशात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. लाँेडाऊन, संचार बंदी, साथरोग निवारण कायदा लागू केला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अंशी यश मिळाले असले तरी अद्याप म्हणावे तसे यश आले नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णाची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना मुळे होणारा म्रुत्यु दर कमी होत असला तरी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत.

दि. २८ आँगस्ट रोजी वागदरी येथील एक रुग्ण उपचारासाठी सोलापूर येते गेला असता कोव्हिड तपासणी नंतर पाँजिटीव्ह असल्याचे समजले तेंव्हा त्यांच्या कुटूंबातील संपर्कात आलेल्या आकार व्यक्तीना क्वरंटाईन करून तपासणी केली असता तिन महिला रुग्ण पाँजिटीव्ह आले. त्यामुळे बाधितांची संख्या चार झाली होती. त्यात वागदरी येथील एक रुग्ण दि.१ सप्टेंबर रोजी मुळव्याधाने त्रस्त झाल्याने उपचारासाठी सोलापूर येथे एका खाजगी दवाखान्यात गेला असता त्याची कोव्हिड रँपीड टेस्ट केल्या नंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. पुढील उपचारासाठी त्याला तुळजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. यामुळेआता वागदरीत कोरोना बाधितांची संख्या पाच झाली आहे.तर हाय रिक्षच्या संख्येत ७ व्यक्ती्ची भर पडून आकरा वरुन १८ झाली आहे व लोरिक्षची एकूण संख्या नव्वदच्या आसपास झाली आहे.एकूण ५ कोरोना  बाधितां पैकी २ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे.


येथे कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने मानवी साखळी तोडण्यासाठी कोरोना दक्षता समिती व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे  आरोग्य अधिकारी डॉ. जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.यशवंत नरवडे,प्रभारी कोरोना दक्षता कक्ष प्रमुख तथा ग्रामसेविका एस.एस.गोरे, आरोग्य सेविका एस.आर.गायकवाड,तलाठी आर.डी.माने,आशा कार्यकर्ती भारतबाई बिराजदार, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे ग्रा.प. सदस्य रावसाहेब वाघमारे अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार,पत्रकार एस.के.गायकवाड तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील आदीनी कोरोना दक्षता कक्ष समिती सदस्यांची बैठकी घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हाय रिक्ष यादीतील व्यक्तीना तुळजापूर येथे तपासणी करिता क्वरंटाईन केले तर लोरिक्ष यादीतील व्यक्तीना होमक्वरंटाईन करुन बाधित क्षेत्र पत्रे लावून शिल केले आहे.

ग्रमस्थानी विनाकारण बाहेर पडू नये पडलेच तर तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधून बाहेर पडावे असी दंवडी देण्यात आली आहे. तसेच गेली दोन दिवस गावात जणता कर्फ्यु पाळण्यात आला आहे. होमक्वरंटाईन व्यक्तीची थर्मल व आँक्सीमिटर तपासणी करण्यात येत आहे.संध्या गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top