नळदुर्ग, दि. 16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी  माजी नगरसेविका सौ. उषा लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनीताई ठाकरे, आमदार राजू पाटील, मराठवाड़ा संपर्क प्रमुख अभिजीत पानसे, सरचिटणीस दिलीप धोत्र यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी नळदुर्ग शहराध्यक्षा पदी सौ. उषा लोखंडे यांची निवड जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा येडगे यांनी केली आहे.

सदर निवड़ीबद्दल मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष अॅड. मतीन बाड़ेवाले, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, उपाध्यक्ष निखील येडगे,अजहर शेख, व सर्व विभाग अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top