कळंब : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 03.09.2020 रोजी 15.20 वा. मौजे मस्सा शिवारातील आश्रुबा फरतडे यांच्या शेतातील शेडमध्ये छापा मारला. यावेळी 1)संजीवन जाधव 2)सुधाकर पवार 3)आश्रुबा मोटे, तीघे रा. मस्सा, ता. कळंब 4)तानाजी पवार, रा. मंगरुळ हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 6,400/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले.


तामलवाडी : हणुमंत काशीनाथ साळुंके, रा. काटी, ता. तुळजापूर हा दि. 03.09.2020 रोजी गावातील दत्त चोकात एका झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 500/-रु. बाळगलेला पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळला.

 
Top