तुळजापुर : कुमार नाईकवाडी

शहरात दि. 23 सप्टेंबरपासून आठ दिवस होणार लॉकडाऊन रद्द करुन सध्या चालू असलेले अनलॉक प्रक्रिया पुढे चालू ठेवावे, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी, तुळजापुर तहसिलदार, न.प. प्रशासन व पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मार्च ते आजतागायत वेळोवेळी काही निर्बंध घालून लॉकडाऊन केलेला आहे. गेल्या महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून अनलॉक प्रक्रिया सुरु केलेली आहे. या अगोदरच चार ते पाच महिने संपूर्ण लॉकडाऊन असल्याने व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. ते कुठेतरी आता अनलॉकचे पालन करत पुर्वस्थितीवर येत असताना मात्र तुळजापुर शहरात न.प. ने आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरील निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होणार आहे. सदरील लॉकडाऊन करताना तुळजापूर वासियांना तसेच व्यापारी वर्गाला कोणतीही पूर्व कल्पना न देता लॉकडाऊन बळजबरीने लादण्यात आल्याचे नमूद करुन सदरील आठ दिवस होणारे लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.





 
Top