जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर तुळजापूर पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळकोट ग्रामपंचायत हे तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाते. ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रशासकाच्या हातात गेली असून प्रशासक म्हणून तांबोळी यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, कुलस्वामिनी सूतगिरणीचे संचालक महेश कदम, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, पत्रकार संजय रेणुके यांनी नूतन प्रशासनासमोर यांनी गावच्या समस्या मांडून नुतन प्रशासक तांबोळी यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम, सुनील माने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर वाडीकर, विजय यादगौडा, समाधान पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


