जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने, तुळजापूर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जळकोटची ग्रामपंचायत प्रशासकाच्या ताब्यात गेली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक पदावर पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती दिना दिवशी तांबोळी यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

जळकोट ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सन-२०१६ साली पार पडली होती. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश राव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. गेल्या पाच वर्षात सौ. कमलाबाई महादेव राठोड,सौ. अलका नरसिंग  हिडोळे व सौ. रेखा संजय माने या तीन महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर उपसरपंच पदावर अर्जुन कदम व बंकट राव बेडगे यांना काम करण्याची संधी मिळाली.दि.१७ सप्टेंबर रोजी नवीन सरपंचाची निवड होणार असताना, सध्या कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक होऊ शकली नाही. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश दिल्याने जळकोट ग्रामपंचायत प्रशासकांच्या ताब्यात गेली आहे. 

ग्रामपंचायतीचे नवे प्रशासक एस.बी. तांबोळी यांनी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणानंतर नवे प्रशासक एस.बी. तांबोळी यांचा पदभार स्वीकारल्याबद्दल जळकोट ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के,माजी उपसरपंच बंकटराव बेडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य ऍड. आशीष सोनटक्के, माजी  ग्रामपंचायत सदस्य कस्तुरा कारभारी, सेवानिवृत्त शिक्षक भालचंद्र पोतदार, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, विरभद्र पिसे, संजय रेणुके, संभाजीनगर शाळेचे दयानंद सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.




 
Top