नळदुर्ग, दि. 17 : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त नळदुर्ग येथील ऐतिहासिक  किल्ल्यात तुळजापुरचे नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा म्हणून नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांना गौरविण्यात आले. 

कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता पत्रकारितेच्या माध्यमातून कर्तव्य बजावणाऱ्या नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांचा नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी टी.डी. कदम आदीजण उपस्थित होते.




 
Top