लोहगाव : निजाम शेख
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरूद्ध व गोवा मुक्ती संग्रामात लढत असताना ज्या स्वातंञ्यविरांना विरगती मिळाली त्या सर्व हुतात्म्यांसाठी तात्कालीन अंतुले सरकारने १९८१ साली महाराष्ट्रात २०९ ठिकाणी स्मारके उभारली. त्यापैकीच तुळजापुर तालुक्यातील नंदगाव येथील येथील स्मारक आहे,
मराठवाड़ा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणाची आहुती देवून मराठवाड्याला स्वातंञ्य मिळवून देणा-या ११ हुतात्म्यांच्या पावणस्पर्शाने पावण झालेले नंदगाव हे गाव. याच गावातील शरणप्पा कलशेट्टी, शिवलिंग कट्टे, भिमराव कोळी, शामाबाई बिरू धनगर, धनप्पा माशाळकर, शिवरूद्र स्वामी, मल्लिकार्जुन वाले, शरणाप्पा वाले, गोविंद काटे, ओंकारप्पा कट्टे, लक्ष्मण कलशेट्टी यांनी स्वातंञ्याकरिता प्राणाहुती देवून होतात्म्य पत्कारले. यांच्या आठवणीत येथे स्मारक उभारण्यात आले.
मराठवाड्यात एकूण ७१ गावात हि स्मारके उभारण्यात आली आहेत. हुतात्म्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी व नव्या पढिला मराठवाड़ा मुक्ती संग्रामचा इतिहास कळावा तसेच राष्ट्रासाठी प्रत्येकात एक समपर्ण भाव निर्माण व्हावा, यासाठी हुतात्मा स्मारकांना मोठे महत्त्व आहे.
नंदगाव येथील हुतात्मा स्मारक गावातील मुख्य दर्शनी भागात असून हे परीसर कायम गजबजलेले असते. याची संपूर्ण देखभाल ग्रामपंचायत करते.


