नळदुर्ग, दि. 17 : तुळजापुर तालुक्यातील कुन्सावळी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमाने कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.

ध्वजारोहणानंतर शाळेच्या परिसरात अशोक, हॉर्नबीम (शो ची झाडे), आवळा, आपटा यासह इतर रानझाडे लावण्यात आली. पैकी 12 झाडांना ट्री गार्ड बसवण्यात आले. तसेच इतर झाडांना काटेरी कुंपण घालण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना घरुन करण्यासाठी मोबाईलद्वारे ऑनलाईन निबंध स्पर्धेचे विषय देण्यात आले.

याप्रसंगी सरपंच कविता गायकवाड, उपसरपंच रुपा शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण शिंदे, उपाध्यक्ष जगदेवी माळकुंजे, सदस्य आकाश माळकुंजे, अंगणवाडी सेविका सविता शिंदे, शिक्षक आर.बी. पवार, पी.डी. जोशी आदीजण उपस्थित होते. 





 
Top