उमरगा, दि. 17 : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा एकुरगावाडी येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना च्या पार्श्वभुमीवर मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

प्रारंभी देशाचे माजी गृहमंत्री लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर औरादे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ.‍ प्रणिता बिराजदार हया होत्या. किशोर औरादे यांनी रजाकार चळवळ, हुतात्म्यांनी दिलेले बलिदान लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचे मराठवाडा मुक्तीमध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याचे बोलताना सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धिरज पाटील, श्रावणी औरादे, शिवराज डावरगे, प्रांजली औरादे, सखाराम जाधव, संदेश औरादे आदींनी परिश्रम घेतले.




 
Top