तुळजापूर : कुमार नाईकवाडी
मराठवाडा सामाजिक संस्थेच्या वतीने दि.१७ गुरुवार रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठवाडा मु्क्तीसंग्रामात आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा सैनिकांच्या समाधीस्थळाचे संस्थेच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, कार्याध्यक्ष संदीप गंगणे, उपाध्यक्ष जीवनराजे इंगळे, सचिव देवेंद्र पवार यांच्यासह छावा संघटनेचे महेश गवळी, संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, आबासाहेब कापसे, दास पाटील आदींची उपस्थिती होती.
