कळंब, दि. 25 : रयत क्रांती संघटना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवार दि. 25 रोजी कळंब येथील  शेतात गुढी उभा करून समर्थन केले. 

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा सौ. सोनाली शिंदे म्हणाल्या की, केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा आणला आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांला मार्केटिंग व्यवस्था उपलब्ध होणार आहे व मार्केट कमिटीच्या जाचातून मुक्त होणार आहे. शेतमाल मार्केट कमिटीच्या बाहेर विकण्याची मुभा मिळणार आहे. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची भीती नष्ट होणार आहे. तरी सर्वांनी या कायद्याचे स्वागत करावे हे आवाहन केले. 

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे तीन विधेयके केंद्रशासनाने लोकसभा व राज्यसभा मध्ये मंजूर करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे स्वातंत्र्य लाभलेली आहे. सदर मागणी स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी 40 वर्षांपासून लावून धरली होती. परंतु त्यावरती निर्णायक भूमिका कोणत्याही शासनाने घेतलेली नव्हती. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या जवळचे व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले माजी मंत्री सदाभाऊ खोत जेव्हा राज्यमंत्री झाले. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फळे व भाजीपाला नियमन मुक्ती करून सदर शेतीमालाच्या स्वातंत्र्याचे पहिले दार खुले केले होते. आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे या तीन विधेयकातील शेतकरी हिताच्या विषयावरती वेळोवेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठपुरावा केला होता. या शेतकरी हिताच्या निर्णयाला कायद्याचे स्वरूप देऊन तीन विधेयके मंजूर केली त्याबद्दल रयत क्रांती संघटना गुढी उभारुन त्याचे स्वागत करत आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.सोनाली शिंदे, सौ.यास्मीन शेख ता अध्यक्षा कळंब,सौ.जयमाला निंगुळे जिल्हा उपअध्यक्षा,सौ.सलमा सोदागर शहरध्यक्षा कळंब,सौ.कुसुम इंगळे तालुका अध्यक्ष परडा,सौ.विदया शिंदे कळंब तालुका उपध्यक्षा ,सौ.निर्मला पाटील उस्मानाबाद तालुकाध्यक्षा यांच्यासह शेतमजूर, कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.


 
Top