तुळजापुर : कुमार नाईकवाडी

राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास उच्च व शिक्षण तथा आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे गुरुवार दि. 24 रोजी श्रीक्षेत्र तुळजापुरात आले संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे मंदिरात न जाता बाहेरुनच राजमाता जिजाऊ महाद्वार असलेल्या पायरीवर सहकुंटुब श्री तुळजाभवानी मातेची यथा सांग पुजा साडीचोळी ओटी भरुन आरती करवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मातेच्या पायरीवर माथा टेकवून या राज्यावरचे कोरोनाचे संकट टळु द, अशी साद घातली. 

यावेळी त्यांचे पारंपरिक पुजारी बुबासाहेब पाटील, सचिन बुबासाहेब पाटील यांनी तनपुरे यांच्या कुंटुबाची कुलधर्म कुलाचार पुजा करुन कवड्याची माळ घालुन आशीर्वाद दिला. या वेळी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मंदीर संस्थानच्या वतीने सत्कारास विनंती केली असता त्यानी स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. 

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, सरचिटणीस गोकुळ शिंदे, युवकचे उपाध्यक्ष सचिन कदम, तालुकाध्यक्ष धेर्यशील पाटील, शहर अध्यक्ष अमर चोपदार, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, बबन गावडे, संदीप गंगणे, गणेश नन्नवरे, खंडु जाधव आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर रा.काँ.च्या कार्यकर्त्यांसोबत  सवांद साधण्यासाठी येथील शासकीय विश्राम गृह येथे ना. तनपुरे रवाना झाले.

 
Top