नळदुर्ग, दि. 24 : अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदल करुन एका व्यक्तीच्या एटीएम कार्डवरुन विविध ठिकांणाहुन तब्बल पावणे दोन लाख रुपये काढून घेतले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धनराज विठोबा सुरवसे, रा. मुर्टा, ता. तुळजापूर हे 10.09.2020 रोजी 17.00 वा. सु. नळदुर्ग येथील एसबीआय बँक शाखेच्या एटीएमच्या खोलीमध्ये पैसे काढत असतांना त्यांच्या नकळत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची आदलाबदल करुन धनराज सुरवसे यांच्या एटीएम कार्डद्वारे वेगवेगळ्या एटीएम केंद्रामधुन दि. 10.09.2020 ते 12.09.2020 या कालावधीत त्यांच्या बँक खात्यामधील एकुण 1,81,220/-रु. रक्कम काढून घेउन त्यांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या धनराज सुरवसे यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम- 66 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
