इटकळ, दि. 25 : तुळजापुर तालुक्यातील इटकळ येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवार दि. 25 रोजी विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने "ढोल बजाओ, सरकार जगावो" आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखला द्यावा,  धनगर समाजाची एसटी प्रवर्गासाठी न्यायालयात  सुरू असलेल्या याचिकेवर चांगल्या वकिलाची नेमणूक करावी ,सरकारने जेआदिवासीना ते धनगर समाजाला या तत्त्वावर दिलेले एक हजार कोटीचे पॅकेज त्वरीत द्यावे, आदी मागण्यासाठी आज राज्यभर ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्यावतीने इटकळ येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. तसेच ऑनलाईन निवेदन इटकळ येथील तलाठी प्रशांत देशमुख यांना देण्यात आले. 

यावेळी अरविंद पाटील, राहुल बागडे, श्रीकृष्ण मुळे, अनिल भोपळे, अमोल बंडगर, गणेश बंडगर, हरीलकडे, विकी बंडगर आदीजण उपस्थित होते 

 
Top